मुंबई : 'शिवसेना संपवण्याचा डाव आहे', असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता केला. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर ठाकरेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. आजही शिवसेनेच्या एका शाखेच्या उद्धाटनावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंडखोरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या नावावर मतं मागावी, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. तसंच गणेशोत्सवाआधी महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकू दे, असं साकडं उद्धव ठाकरेंनी गणरायाला घातलं. तसंच वाढदिवसाला सदस्य नोंदणीची भेट द्या, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं. 


उद्धव ठाकरेंच्या हस्ते अभ्युदयनगरमधल्या नूतनीकरण झालेल्या शिवसेना शाखेचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. 


शिवसेनेचा मुख्यमंत्री तेव्हाच केला असता तर सन्मानानं झालं असतं, मनावर दगड ठेवण्याची वेळच आली नसती असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय. तेव्हा आमचं ऐकलं असतं तर अडीच वर्षांसाठी भाजपच्या एकाला तरी मुख्यमंत्रीपदाचा शेंदूर लागला असता असा टोलाही त्यांनी लगावलाय.