Uddhav Thackeray: मला सर्वात जास्त दया भाजप कार्यकर्त्यांची येतेय; ते सतरंज्यांखाली दबलेत!
Uddhav Thackeray On Rana Family: मी घरी बसून काम केलं ते तुम्हाला करता येत नाही. सरकार आपल्या दारी जातंय पण तुम्हाला कोणी घरी उभं करत नाही.
Uddhav Thackeray On Rana Family: मी घरी बसत होतो पण मी कोणाची घर फोडली नाही,असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारला लगावला. अमरावतीतील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
बोगस सर्टिफिकेट देऊन मी मत मागत नाही, असा टोला उद्धव ठाकरेंचा राणा दाम्पत्याला लगावला. अमरावतीमध्ये घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. उद्धव ठाकरे अमरावतीत पोहोचल्यावर नवनीत राणा आणि रवी राणा हे त्यांच्यासमोर हनुमान चालीसा पठण करणार होते. पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्याने हनुमान चालीसावरुन
मुंबई पालिकेचा कोविड घोटाळा शोधायचा असेल तर देशातल्या प्रत्येक पालिकेतील घोटाळा शोधा. पीएम केअर फंडातील घोटाळा शोधा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाषणातील महत्वाचे मुद्दे
दिसला भ्रष्ट की टाकला भाजपमध्ये
माझ्याकडे काहीही नाही मग मला का घाबरता?
तुमच्या हाती उपऱ्यांचा द्रोणागीरी
मी घरी बसत होतो पण मी कोणाची घर फोडली नाही.
मी घरी बसून काम केलं ते तुम्हाला करता येत नाही. सरकार आपल्या दारी जातंय पण तुम्हाला कोणी घरी उभं करत नाही.
मतदार माझ्यासाठी राजा, मी मतदाराला गुलाम मानत नाही
काही बोगस लोकं म्हणतायत मी मतांची भीक मागायला आलोय
मुह मे राम आणि बगल मे छुरी असं आमचं हिंदुत्व नाही हे आमचं हिंदुत्व नाही तर मुह मै राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारीचं