उद्धव ठाकरे यांच्या मिरा-भाईंदरमधील भाषणाचे ठळक मुद्दे
मिरा भाईंदरमध्ये भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
मिरा भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
- निवडणूकीनंतर इतर पक्षाच्या फोटोंमधील किती लोकं धावून येतात ते बघा.
- मिरा-भाईंदरच्या महानगरपालिक्वर शिवसेनेचा भगवा हवा इतर फडकं नको.
- आपण इतर पक्षासारखी लोकं फोडाफोडी केली नाही, लोकं स्वत:हून आपल्याकडे आली.
- मागे एक लाट आली होती, त्या लाटेतही शिवसेना तशीच राहिली.
- वातावरण चांगलं आहे, ही ताकद 20 तारखेला दाखवा मला इकडे भगवा फडकलेला पाहायचा आहे
- एक हाती सत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही
- आम्ही फोडाफोडी नाही केली, ही लोकं विश्वासाने आलेली आहे
- लाटा येतात आणि जातात, मागे जनता पक्षाची लाट आलेली होती, अनेक जण बुडाले पण शिवसेना आहे तशीच होती, आता खूप पुढे गेलीय
- भाजपनं बाहेरच्या लोकांना संधी दिलीय, बाहेरून आलेली लोकं भरलीय
- ईव्हीएम मशीनवर लक्ष द्या, धनुष्यबाणासमोर बटन दाबले की लाईट पेटतय का ते बघा
- ईव्हीएम मशीन हे लोकशाहीचा अपमान आहे, आम्ही म्हणतोय पेपर आणा तर नाही म्हणतात वेळ लागतो मग विद्यापीठाचे निकाल का उशिरा लागतात
- ज्यांनी मरमर केली त्यांना बाजूला सारुन इतर लोकांना टिकिट देण्याचं काम आपण केलं नाही.
- मतदान करताना बटन दाबल्यानंतर धनुष्यासमोरचाच दिवा लागतो की नाही हे बघा.
- इव्हीएमच्या माध्यमातून माझं मत कुणाला जातंय हे कळण्याचा माझा हक्क हिरावल्या गेलाय
- लवकर निकाल लावण्यासाठी जस ईव्हीएम वापरता तसंच मग विद्यापीठाचा निकाल लवकर लागावा याचं बघा.
- मुख्यमंत्री अंगावर काही लावून घेत नाही.
- तुम्ही नोटबंदी करुन काळा पैसा घालवला, मग आता ही लोकं कुठला पैसा वापरता.
- भाजपा चे कार्यकर्ते म्हणून त्यांना पळवाटा.
- यांच्याकडे लोकं फोडायला पैसा, सत्तेवर यायला पैसा, मत विकत घ्यायला पैसा मग गोरखपुर मध्ये ऑक्सिजन घ्यायला पैसा नाही
- विद्यापीठाचा विषय मुख्यमंत्री अंगाला लावून घेत नाही, मग कोण घेणार, शिक्षण मंत्री कशाला देता?
- नोटबंदी करून काळ पैसा घालवला, मग निवडणूकीत पैसे वाटतात तो रंग कुठला आहे?
- गोरखपूरमध्ये मुलं तडफडून मेली, मतं घ्यायला पैसे आहेत पण ऑक्सिजन घ्यायला पैसे नाहीयत-
- आम्हाला पैसे वाटण्याची गरज लागत नाही, पक्ष फोडायला पैसे आहेत, लोकं फोडायला पैसे आहेत
- कडक कारावाई होणार पण, आणखी मुलं गेल्यानंतर कारवाई होणार
- आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आम्हाला वाटले जनतेचं काही भलं होईल मात्र काय भेटलं ते तुम्हीच बघा
- जे-जे पावसाळ्यापूर्वी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते त्यांनी सांगा कुठे तुंबल पाणी, कुठे दिसले खड्डे
- ही लोक(भाजपा) जी काम कॉंग्रेसनी सुरु केली तीच दाखवतात
- आम्ही मुंबईत पेंग्वीन आणले ते आमच्या मुंबईच्या, मिराभाईंदरच्या मुलाला दाखवायला आणलेत. त्यांना कधी बघू नयेत का?
- एकाही रस्त्यावर खड्डे पडले नाहीयत, पाणी साचलं नाही कामं होण्याआधीच भ्रष्टाचार झाला अशी बॉंब मारतात, आम्ही पेंग्विन आणले दुर्देवाने त्यातला एक मेला आणि बॉंब सुरू झाली
- माझ्या जनतेनं पेंग्विन बघायची नाही का?
- 26/11 च्या हल्ल्यानंतर आर आर पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना जावं लागलं होतं, मग उत्तरप्रदेशात जे बोलतात त्याचं काय?
- बोरीवलीपर्यंतची मेट्रो इकडे आणली हे काम शिवसेनेनं केलं आहे, पाण्याचा प्रश्न, आरोग्य सेवा नाही एका नाट्यगृहाचा प्रश्न विचारायचे , आणि मत देऊन मोकळं व्हायचं