Uddhav Thackeray withdraws Maharashtra bandh : बदलापूर अत्याचार घटनेनंतर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)  शनिवारी म्हणजे 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीने पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर असल्याची टिपण्णी उच्च न्यायालयाने केली आहे. त्यावर आता शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, तोंडावर काळी पट्टी बांधून आंदोलन करणार असल्याचं उद्धव ठाकरे .यांनी म्हटलंय. एकीकडे शरद पवार आणि काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली असताना उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.


काय म्हणाले उद्धव ठाकरे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाचा आदर राखावा लागतो. उद्याचा बंद आम्ही नक्कीच मागे घेतोय. पण आम्ही उद्या प्रत्येक गावात आणि चौकात तोंडाला काळे फिते बांधून निषेध करणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी उद्या सकाळी 11 वाजता शिवसेना भवनाच्या चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध करणार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.


न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही उद्या राज्यभर निषेध आंदोलन करणार आहे. न्यायालयाचा आदर ठेऊन आम्ही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला जाता येत होतं, पण तितका वेळ नाही. पण जनतेने या अन्यायाविरुद्ध आमच्यासोबत सामील व्हावं, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय. न्यायालयाने हीच तत्परता आरोपींना शिक्षा देण्यासाठी दाखवावी, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत.


पोलीस जर तक्रार नोंदवरून घेत नसतील तर कोर्टाने या प्रकरणात लक्ष दिलं पाहिजे. बदलापूर घटनेवर कोर्टाचं वक्तव्य हे मुख्यमंत्र्यांना चपराक नव्हतं का? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.



दरम्यान, बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे.  आजही अटक सुरू आहे दरोडेखोरांना आणतात तसे आणले, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.