रत्नागिरी : राष्ट्रवादीत १५ वर्षे खूप सहन केलं. आघाडी सरकार असताना मतदारसंघात कामं झाली नाहीत अशी तोफ उदयनराजेंनी डागली. शिवेंद्रराजे आणि आपल्यात खटके उडत नव्हते. तर काहीजणांकडून उडवले जात होते, आता खटके उडवणारेच आमच्यासोबत नाहीत असा घणाघाती आरोप उदयनराजेंनी केला आहे. भाजप प्रवेश केल्यावर उदयनराजेंनी सर्वप्रथम झी २४ तासला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजे भोसले यांच्यावर याआधी शरद पवारांनी नाव न घेता टीका केली. 'सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आलेले पळपुटेपणाची भूमिका घेत असतील, तर लोकच त्यांचा समाचार घेतील.'


उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. याआधी उदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटील रिंगणात होते. पण आता उदयनराजे भाजपमध्ये आल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळेच की काय त्यांनी शरद पवारांची आज भेट घेतली. दुसरीकडे काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. पण ते तयार नसल्याचं देखील कळतं आहे.


उदयनराजे भोसले यांची एक्सक्लुझिव मुलाखत