विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, यूजीसीने विद्यापीठांना परीक्षेबाबत दिला `हा` सल्ला

University Grants Commission : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्याची अमलबजावणी झाली तर आता अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असला तरीही विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत परीक्षा देता येणार आहे.
University Grants Commission : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. यूजीसीनं विद्यापीठांना सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेमध्ये उत्तरं लिहू द्या. अभ्यासक्रम जरी इंग्रजी भाषेमध्ये असला तरी विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत उत्तरे लिहिण्याची परवानगी द्या, असा सल्ला यूजीसीने दिला आहे. तसेच शिकवतानाही स्थानिक भाषेचा वापर करा, असा सल्ला देण्यात आला आहे. (UGC asks universities to allow students to write exams in local languages)
स्थानिक भाषांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र लिहून ही विनंती केली आहे. या निर्णयामुळे स्थानिक भाषांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उच्च शैक्षणिक संस्था पाठ्यपुस्तके तयार करण्यात आणि मातृभाषा स्थानिक भाषांमध्ये शिकविण्याच्या शिक्षण प्रक्रियेला पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असले तरी स्थानिक भाषांमध्ये उत्तरे लिहिण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. UGC सल्ला देताना म्हटले आहे की, सर्व राज्यांतील उच्च शैक्षणिक संस्थांनी स्थानिक भाषांमध्ये शिकवणे आणि शिकणे प्रोत्साहित केले पाहिजे. दोन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रणनीती सूचीबद्ध केल्या आहेत. प्रत्येक संस्था आणि विद्यापीठात स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असलेली पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके आणि इतर अभ्यास सामग्रीची शिस्तनिहाय यादी UGC कडे सादर करण्याची आवश्यकता आहे.
यूजीसीने मागविली ही माहिती
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील विद्यापीठांना अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या सल्ल्याची अमलबजावणी झाली तर आता अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात असला तरीही विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत परीक्षा देता येणार आहे. दरम्यान, मुख्य विषय अभ्यासर्कमाची विषयनिहाय यादी. त्यासाठी पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, अभ्यास साहित्य स्थानिक भाषांमध्ये लिहिणे किंवा अनुवादित करणे आवश्यक आहे. या सामग्रीचे भाषांतर करु शकरणाऱ्या संस्था, विद्यापीठातील शिक्षक, विषय तज्ज्ञ यांची विषयवार उपलब्धतेबद्दल माहिती आणि स्थानिक भाषांमध्ये पाठ्यपुस्तके छापण्यासाठी स्थानिक प्रकाशकांची माहिती मागविण्यात आली आहे. स्थानिक भाषांमध्ये अभ्यास साहित्य आणण्याच्या योजनांवरील चर्चा तसेच विद्यार्थ्यांना स्थानिक भाषांमध्ये उत्तरे लिहू देण्याबाबत विद्यापीठाच्या सध्याच्या तरतुदी आहेत का, याविषयीची नोंदही संकलित केली जाणार आहे.
स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश चांगला आहे. भविष्यातील दृष्टीकोण चांगला आहे. पण प्रश्नपत्रिकाही प्रादेशिक भाषांमध्ये असायला हव्यात. स्थानिक भाषांमध्ये उत्तरे दिल्यास परीक्षकांसाठी समस्या निर्माण होईल. त्यांचे वेगळेपण कसे हाताळले जाईल, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच जे विद्यार्थी त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये शिकत आहेत ते मागे राहणार नाहीत, अशी काहींची याप्रश्नी भूमिका आहे. परंतु विद्यार्थ्यांनी हक्क म्हणून या पर्यायाचा वापर केल्यास संपूर्ण गोंधळ होईल, असे म्हटले जात आहे.