सोलापूर : महाराष्ट्राच्या प्रमुख धरणांपैकी महत्त्वाचे असणारे उजनी धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात आज 117 टीएमसी पाणीसाठा झाला असून उजनी धरण १०० टक्के भरले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी २०१८ मध्ये २७ ऑगस्टला धरण १०० टक्के भरलं होतं. त्यानंतर ७ ऑगस्ट २०१९ मध्ये धरण १०० टक्के भरलं होतं आणि यावर्षी ३१ ऑगस्टला उजनी धरण १०० टक्के भरले आहे. 


पुणे परिसरात झालेल्या पाऊसामुळे उजनी धरणात झपाट्याने वाढ झाली आहे. इतर धरणं भरल्यानंतर त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे आज अखेर उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या दौंड वरून 23 हजार क्यूसेक विसर्गाने पाणी येत आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल असल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.