नवी मुंबई : भारतात खेळवण्यात येणा-या १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर महिन्यात फुटबॉल वर्ल्ड कपला सुरुवात होईल. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये या वर्ल्ड कपच्या एकूण ८ मॅचेस या स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील. यामुळे नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातीस फुटबॉलप्रेमींना या फुटबॉल मॅचेसचा आनंद लुटता येईल.