Nilesh Rane Pune : माजी खासदार निलेश राणे यांचे पुण्यातील हॉटेल सील करण्यात आले आहे. पुणे महापालिकेने राणे यांच्या हॉटेलवर मोठी कारवाई केली आहे. या कारवामुळे पुण्यात खळबळ उाडली आहे. नीलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलेश राणे यांच्या नावे असलेल्या शिवाजीनगर भागातील डेक्कन परिसरातील आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलला मिळकतकर थकवल्याप्रकरणी पुणे महापालिकेने टाळे ठोकले आहे. महापालिकेने अनेक वेळा नोटीस देऊनदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेच्या करसंकलन विभागाने जोरदार कारवाई करून ही मिळकत सील केली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या मिळकतीची साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी थकली होती.


महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे. शंभर टक्के करवसुलीसाठी महापालिकेकडून धडक कारवाई केली जात आहे. ही मोहीम राबविताना केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या नव्हे तर राजकीय बड्या व्यक्तींच्यादेखील मिळकती सील केल्या जातील, असा संदेश महापालिकेने राणे यांची मिळकत सील करून दिला असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.


मात्र, ही मिळकत सील करताना मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. इतर ठिकाणी साधी कारवाई केली तरी मोठा गाजावाजा करत माहिती प्रसिद्ध केली जाते. राणे यांच्या मिळकतीचा थकबाकी मिळकतकर भरावा, याबाबत महापालिकेकडून नोटिसा बजावूनही हा कर भरला जात नव्हता. मात्र, अखेर महापालिकेने तीन मजल्यावरील राणे यांची मिळकत सील केली आहे. 


3 कोटी 77 लाख 53 हजार 803 रुपयांची थकबाकी


निलेश राणे यांच्यावर मिळकतकराची थकबाकी थकली होती. 3 कोटी 77 लाख 53 हजार 803 रुपये एवढी रक्कम मागील तीन वर्षांपासून थकलेली आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांची काही प्रमाणात थकबाकी थकली तरी त्याला नोटीस देऊन दंड भरून वसूल केली जाते. राजकीय व्यक्तीला नोटीस देताना दबाव आणला जात होता. त्यामुळे कोणतीही कारवाई होत नव्हती. काही महिन्यांपूर्वी पालिकेने नोटीस बजावल्यानंतर थेट महापालिका आयुक्तांनाच फोन करून कारवाई न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर, पालिकेने कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, मंगळवारी अखेर पालिकेने या मिळकतीला टाळे ठोकले असून थकबाकीपोटी ती सील केली आहे. करआकारणी व करसंकलन विभागाने मंगळवारी एकूण 16 मिळकती जप्त करून आठ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली. 


बनावट नोटा देत विद्यार्थ्याची फसवणूक


पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दिघी मधल्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्या नंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी बनावट नोटा चलनात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातल्या निखिल गदळे या विद्यार्थ्याला ऐक लाखाचे तीन लाख रुपये देतो असं सांगत त्याला केवळ ऐक हजार रुपये देण्यात आले, ते ही नकली आहेत.