केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना बाधीत
नाशिक जिल्ह्यातील दोन्ही खासदार कोरोना बाधित
नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात कोरोना बाधितांचे आकडेही तिपटीने वाढत आहेत. असे असताना नाशिक जिल्ह्यातील खासदार भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे अहवाल रात्री जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले. नाशिक जिल्ह्याच्या दोनही खासदाराना एकाच वेळी कोरोनाची लागण झाली आहे. डॉ. भारती पवार ह्या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील आहे तर हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदार संघातील आहेत.
चार दिवसापूर्वी भारती पवार यांनी मुंबईत महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. पत्रकार परिषदेत मुंबईत त्यांनी राज्यातील परिस्थितीचे विश्लेषण केले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी नशिक मधील अनेक कार्यक्रमाना त्यांनी एकत्र हजेरी लावली होती.
डॉ. भारती पवार खासदार आणि राज्य आरोग्य मंत्री ह्या गेल्या काही दिवसा पासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या काळात त्यांनी अनेक जिल्ह्यात जाऊन कोरोनाची आढावा बैठक घेतली होती. लसीकरणा बाबत जनजागृतीसाठी ग्रामीण भागात अनेक कार्यक्रम घेतले. दोन दिवसापूर्वी १५ ते १८ वयोगटातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन त्याच्या हस्ते करण्यात आले होते. बुधवारी ५ जानेवारी ला त्यांचा मुंबई दौरा होता. या दौऱ्याला नाशिकहून मुंबई ला जात असताना त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचा संशय आल्याने त्यांनी ताबडतोब तपासणी करून घेतली. त्यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला असून त्यांना घरीच विलगीकरण करून उपचार सुरु आहेत.
तर खासदार हेमंत गोडसे यांचा हि कोरोना अहवाल बुधवारी ५ जानेवारी ला पॉझीटीव्ह आला आहे. गोडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. दोन दिवसापूर्वी नाशिक मधील केंद्रीय रुग्णालयाचे आणि १५ ते १८ वयोगटातील लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते एकत्र होते.
बुधवारी अहवाल पॉझीटीव्ह आल्या नंतर दोघांनीही ट्विटर द्वारे माहिती दिली असून संपर्कात आलेल्यां व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केल आहे.