औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या सौभाग्यवती निर्मला दानवे यांच्यासह बैलगाडीवरुन (Bullock Cart) फेरफटका मारला. यावेळेस मिसेस दानवेंसोबत त्यांची नातही आहे. या बैलगाडीची रंगसंगतीही भाजपच्या ध्वजासह मिळतीजुळती आहे. दानवे यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबूकवरुन बैलगाडीतून फेरफटका मारतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. (Union Minister of State for Railway Raosaheb Danve drive Bullock Kart with her wife and Grand daughter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोस्टमध्ये काय म्हंटलंय?


वा शिवाची बैल जोड़...
लाविल पैजंला आपली कुडं....


"आयुष्याच्या प्रवासात भक्कम साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी व त्याचबरोबर माझ्या नाती सोबत गावी असताना बैलगाडीवरून शिवारात फेरफटका मारला", अशा आशयाची पोस्ट दानवे यांनी केली आहे.
 


रावसाहेब दानवे यांच्याबाबत थोडक्यात


मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री असलेलेल दानवे यांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात 18 मार्च 1956 साली झाला होता.  त्यांनी कला शाखेतून पदवी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. 



 


पत्नी 3 मुली, 1 मुलगा असा त्यांचा परिवार आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे त्यांचे जावई आहेत.  


राजकीय प्रवास


रावसाहेब दानवे यांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री असा गल्ली ते दिल्ली थक्क करणारा प्रवास आहे. त्यांची ग्रामीण राजकारणावर घट्ट पकड आहे. त्यांना राजकारणात 3 दशकांपेशा अधिक अनुभव आहे.