हेमंत चापुडे / पुणे : Pune rural bullock cart competition : जीवाचा थरकाप उडवणारी दृश्यं. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शर्यतीच्या घाटात मुक्या प्राण्यांमुळे एकाचा चक्क तीन वेळा जीव वाचला. वाऱ्याच्या वेगाने घाटात सगळ्यात पुढे पळणाऱ्या घोडीवर बसलेला एक व्यक्ती खाली कोसळला. (Junnar Horse Accident) तिथून सुखरुप बाहेर आला आणि मागून येणाऱ्या दोन्ही बैलगाड्यांच्या खालूनही सुखरुप बचावला. (Pune Bullock cart race)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घोडीवरुन खाली कोसळलेल्या आणि बैलांच्या पायाखाली आलेल्या या मालकाला भरधाव वेगाने येणाऱ्या बैलजोडीने उडी मारुन वाचवले. शर्यतीच्या घाटात मध्यावर असणाऱ्या या बैलजोड्यांनी प्रचंड वेगात असूनही प्रसंगावधान दाखवत आपल्या मालकाचे प्राण वाचवलेत.


शर्यतीच्या घाटात हा सर्व थरारक प्रकार बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. नशीब बलवत्तर आणि मुक्या प्राण्यांनी आपल्या मालकावर दाखवलेले निस्सीम प्रेम यामुळेच हा घोडेस्वार तरुण या अपघातातून सुखरुप वाचलाय.



एकीकडे स्वत:च्या मनोरंजनासाठी बैलांच्या झुंज लावण्याची आणि बैलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे हे प्राणी मात्र माणसावरचं आपलं प्रेम दाखवून देतायेत. या थरारक क्षणाची जोरदार चर्चा आहे. मुक्या प्राण्याच्या प्रेमाची चर्चा होत आहे.