Pune Crime: आपल्या सेलिब्रिटींसोबत ओळखी आहेत वैगेरे सांगून लुटण्याचे अनेक प्रकार समोर येत असतत.त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. सेलिब्रिटींच्या नावे फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या टोळीने पुण्यात आपले कार्यालय थाटले होते. यामध्ये आरोपींना दिशाभूल करुन 9 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.  उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये चित्रपट कलाकारांना बोलावून चॅरिटी शो आयोजित करण्याचे नाटक एक टोळी करत होती. या टोळीच्या सूत्रधारासह तीन आरोपींना एसटीएफने अटक केली आहे.महाराष्ट्रातील पुणे येथून विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना तर गुजरातमधील अहमदाबाद येथून समीर कुमार,जितेंद्रभाई शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. एसटीएफने यासंदर्भात माहिती दिली.


चॅरिटी शो आयोजित करण्याच्यानावे फसवणूक 


आरोपींनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये चित्रपट कलाकारांचा शो आयोजित करणार असल्याचे जाहीर केले. येथे टायगर श्रॉफ, सनी लिओन, नोरा फतेही, गायक गुरु रंधावा, सचेत आणि परंपरा यांना आमंत्रित करून चॅरिटी शोचा बहाणा केला. या बहाण्याने श्री सुविधा फाऊंडेशन ट्रस्टकडून सुमारे नऊ कोटी रुपये उकळले होते. 


या प्रकरणी सुशांत गोल्फ सिटी आणि गोमतीनगर विस्तार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपी अत्यंत धूर्त असून अनेक महिन्यांपासून फरार होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एसटीएफची मदत घेण्यात आली होती.


तपासात धक्कादायक खुलासे 


विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली. त्याला शनिवारी ट्रान्झिट रिमांडवर गोमतीनगर विस्तार पोलीस ठाण्यात आणण्यात आले. 


घटनेचा सूत्रधार विराजने चौकशीदरम्यान एसटीएफला माहिती दिली. 2021 मध्ये तो आणि समीर शर्मा यांचा लखनऊमध्ये रुग्णालय सुरू करण्याचा मानस होता. दरम्यान, लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये चॅरिटी शो आयोजित करण्यासाठी त्यांनी स्टेडियमचे व्यवस्थापक गौरव सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर स्टेडियमची एक कोटी रुपयांमध्ये बुकिंग ठरवली. यानंतर गौरव यांनी त्यांची मुलाखत चॅरिटी शोसाठी फिल्म स्टार्स बुकींग करणाऱ्या अमित सिंग नावाच्या व्यक्तीशी करुन दिली.


विराजने दिलेल्या माहितीनुसार,  त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या शोसाठी काही चित्रपट अभिनेते आणि गायकांची निवड केली. यामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ, मनीष पॉल, अभिनेत्री सनी लिओनी, नोरा फतेही आणि गायक गुरु रंधावा आणि सचेत-परंपरा यांचा समावेश होता.