पुणे : ट्रॅफिक ही सर्वच प्रमुख शहरांची मोठी समस्या बनली आहे. दिवसागणिक गाड्यांची संख्या वाढल्याने यामध्ये आणखी भर पडत आहे. नो पार्किंग असलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावर ताण पडलेला दिसतो. यावर जालीम उपाय काढण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जातो. पुणेकरांना येणाऱ्या काळात याचा चांगला फटका बसणार आहे. पुण्यात नो पार्किंगमध्ये गाडी लावणं आता महागात पडणार आहे. कारण महापालिकेनं पार्किंगबाबत धोरण तयार केलंय.


जागेवर अतिक्रमण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 चुकीच्या जागी गाडी लावल्यास ते महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण समजलं जाणार असून जास्तीत जास्त २५ हजारांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे.


धोरणाची अंमलबजावणी 


 वाहतूक पोलीसांच्या मदतीनं या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणानुसार वाहतूक पोलीस कारवाई करतील तर, कारवाईसाठी आवश्यक वाहनं, क्रेन आणि मनुष्यबळ महापालिका पुरवणार आहे.


जप्त केलेली वाहनं ठेवण्यासाठी महापालिका जागाही उपलब्ध करून देणार आहे.


दंडातून मिळणारं उत्पन्न महापालिका आणि वाहतूक पोलीस समसमान वाटून घेतील.