प्रशिक्षण रोखल्यानंतर पूजा खेडकरांना आणखी एक धक्का! UPSC ने पाठवली नोटीस, म्हणाले `तुमची...`
IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) याचं प्रशिक्षण रोखण्यात आल्यानंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच उमेदवारी रद्द का करु नये यासंबंधी कारणे दाखवा नोटीस (Showcause Notice) पाठवण्यात आली आहे.
IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) याचं प्रशिक्षण रोखण्यात आल्यानंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. युपीएससीने तुमची उमेदवारी रद्द का करु नये यासंबंधी कारणे दाखवा नोटीस (Showcause Notice) पाठवली आहे. तसंच यापुढे कोणतेही परिक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. युपीएससीनं पूजा खेडकर प्रकरणात सखोल तपास केला आहे. पूजा खेडकरांनी जास्त वेळा परीक्षा दिल्या असून यावेळी युपीएससीचे नियम डावलण्यात आले.
पूजा खेडकरांनी अनेकवेळा परीक्षा दिली, जे युपीएससीच्या नियमात बसत नाही. ओळखपत्र बदलून आणि आई वडीलांचे आणि स्वतःचे नाव बदलून परीक्षा दिल्या. ई-मेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली होती. युपीएससीकडून सखोल चौकशी करण्यात आली. ओबीसी उमेदवाराला नऊ वेळा परीक्षा देता येते. पूजा खेडकरांनी त्यापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिली. त्यासाठी नावात बदल केला, ओळख पत्रावरील फोटो तसंच सही देखील बदलली. गैरमार्गाचा अवलंब करून युपीएससी मध्ये दाखल झाल्याने त्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. इतकंच नाही तर पुढच्या काळात शासकीय नोकरीसाठीची कुठलीच परीक्षा देता येणार नाही.
याआधी पूजा खेडकरांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री अकादमी मध्ये परत बोलवण्यात आलं होतं. आता त्याही पुढे जात युपीएससीने थेट पूजा खेडकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना पूजा खेडकर यांनी जे आरोप केले आहेत त्यांची नोटीस मला मिळाली नाही अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलणार असंही त्यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे पूजा खेडकर उद्या पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात हजर होणार आहेत. पूजा खेडकर यांनी पोलिसांकडून वेळ मागून घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
पूजा खेडकर अजूनही वाशीमच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. मागील 60 तासांपासून रूमच्या बाहेर पडलेल्या नाहीत. विश्रामगृहाची बुकिंग उद्या सकाळपर्यंत वाढविण्यात आलं आहे. त्यामुळे त्या आज वाशीम वरून सायंकाळी निघण्याची शक्यता आहे. मागील 60 तासापासून अद्यापपर्यंत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांना मसुरी येथिल प्रशिक्षण केंद्रात 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश आहेत. 17 जुलैला विश्रामगृह आरक्षण संपलं होतं. पूजा खेडकर यांना पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत काल पुणे आयुक्त कार्यालयात जवाब नोंदीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली होती.