Upsc Student Dies: कलेक्टरचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीचं आयुष्य संपवलं...
Student Death in Akola : श्रीकांत रोज एमपीएससी आणि युपीएससी (MPSC And UPSC Exams Preparations) या दोन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असे आणि त्यासाठी तो लायब्ररीतही जात असे.
Student Commits Suicide who was preparing for Competative Exams: स्पर्धा परीक्षेची तयारी करणं आणि ती यशस्वीरीत्या पास करणं हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो. काहींना यश मिळते तर काहींना अपयश. वारंवार अपयश आल्यानं आपलं आयुष्य संपवण्यापर्यंतचे टोकाचे पाऊलही काही जण उचलतात. वारंवार अपयश (Competative Exams) आल्यानं हताश झालेल्या तरूणांची संख्याही कमी नाही. त्यामुळे दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षा आणि त्यामुळे येणारे अपयश यामुळे आत्महत्येचाही विचार करणारी तरूणाई हा विषय आजच्या काळातला सगळ्यात संवेदनशील विषय ठरला आहे. अशीच एक धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत कलेक्टर होण्याची स्वप्न पाहणाऱ्या एका 30 वर्षीय तरूणानं आपलं (30 Year boy dies) आयुष्य संपवलं आहे.
श्रीकांत संजय राऊत असं आत्महत्या करणाऱ्या मुलाचं नावं आहे. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव जवळील एक नाल्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. त्याच्या जवळच बोरगाव मंजू पोलिस स्टेशन आहे आणि बाजूला एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. त्याचा मृतदेह पाहून आजूबाजूच्या लोकांनी तो बाहेर काढला आणि त्याची ओळख पटवली. त्यानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार श्रीकांत रोज एमपीएससी आणि युपीएससी (MPSC And UPSC Exams Preparations) या दोन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असे आणि त्यासाठी तो लायब्ररीतही जात असे. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्याचा तो रहिवासी होता. तेथील दोन लायब्ररीत तो अभ्यासासाठी जात असे. स्पर्धा परीक्षांसाठी तो जिद्दीनं तयारी करत होता. त्याला जिथे जिथे संधी मिळायची तिथे तिथे जाऊन तो परीक्षा द्यायचा आणि चांगले गुणंही प्राप्त करायचा. त्यातून त्यानं नुकतीच एका परीक्षा केंद्रातून (Exam Centres) परीक्षा दिली होती त्यात त्यानं चांगले प्राविण्यही मिळवले होते. त्यानंतर मुलाखतीसाठी तो मुंबईत येणार होता परंतु निकालापुर्वीच त्यानं आपलं जीवन संपवलं आहे.
कोण होता श्रीकांत संजय राऊत?
श्रीकांत हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता आणि त्यानुसार कलेक्टर (Collector) व्हायची स्वप्न पाहत होता. दरम्यान स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना श्रीकांत सेंट्रल बँकेतही नोकरीवर होता. परंतु कलेक्टर होण्याचे स्वप्न तीव्र असल्यानं त्यानं नोकरी सोडली होती.
नक्की काय घडली घटना?
रिपोर्ट्सनुसार, नेहमीप्रमाणे श्रीकांत हा सकाळी 9 वाजता अभ्यासासाठी लायब्ररीत जायला निघाला आणि काही वेळातच दुपारी 1.30 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची बातमी कुटुंबियांना समजली. या घटनेबाबत पोलिसांनी पंचनामा केला आहे. श्रीकांतच्या मृतदेहासमोर एक बॅगही आढळली आहे. त्यात अभ्यासाचं सामान आणि पांढऱ्या रंगाची बॉटल सापडली आहे. त्यामध्ये विषारी औषध होते की काय, असा पोलिसांना संशय आहे. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post Mortem) करण्यात आले आहे.