Uran Crime: रागावर नियंत्रण नसल्यास माणूस काय करेल? हे सांगता येत नाही. नुकतेच बेलापूरमध्ये एका 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता. त्याआधी नालासोपारा येथे खिळा ठोकल्याच्या वादावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेला खाली पाडून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणीच्या अंगावरील कपडे फाडण्याची घटना घडली आहे. यानंतर आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरण येथे झालेल्या भांडणात एका 18 वर्षीय तरुणीचे कपडे फाडण्यात आले.  तिला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली तसेच तिच्या अंगावर प्लास्टिकचा ड्रम फेकल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात 4 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. या 8 जणांविरोधात अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


उरण मधील न्हावे गावात ही घटना घडली आहे. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद  सुरू झाला होता. पीडित तरुणीच्या आईला   आरोपी महिला मेघा पाटील यांनी शिवीगाळ केली होती. तसेच मेघा पाटील यांनी पाण्याचा ड्रम पीडीत तरुणीच्या आईच्या दिशेने फेकला. यावेळी पीडित तरुणी मद्यस्थि करण्यास आली. पण मेघा पाटील आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तरुणीचे कपडे फाडले. 


पीडित तरुणीला मारहाण आणि शिवीगाळ केली. याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. याप्रकरणी 8 जणांविरोधात न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


शेजाऱ्यांसोबतच्या भांडणात 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार


बेलापूरमध्ये एका 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. 9 महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बेलापूरमधील पंचशील नगर झोपडपट्टीत शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात भयंकर घटना घडली आहे. या भांडणातून शेजाऱ्याने 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केला. 9 महिन्याच्या बाळाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन आरोपी झाला फरार झाला आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कसून शोध घेत आहेत. 9 महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.