पुणे : भात शेतीचं आगार अशी ओळख असलेला भोर, वेल्हा परिसर. या तालुक्यात पाऊस जास्त असल्याने पारंपरिक पद्धतीने भात शेती केली जाते. यंदा काही शेतक-यांनी अत्याधुनिक यंत्रांचा वापर करुन भात लावणी करतायत. पीढीजात पारंपरिक भातलावणी पद्धतीमुळे वेळ आणि मजुरावर जास्त खर्च होत असे. यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या आत्मा योजनेमार्फत शेतक-यांना भातलावणी विषयी माहिती देण्यात आली. वेळ आणि मजूर खर्चात बचत होत असल्याने भोरमध्ये पहिल्यांदाच यांत्रिक भात लागवड होते आहे. यामुळे या योजनेचा चांगला फायदा होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच वेळी भात लावणीमुळे मजूर मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे भातलावणी लांबते. त्याचा पिकावरही परिणाम होतो. यावर यांत्रिक लागवड हा चांगला उपाय ठरतोय. कृषी विभागाने याआधीही हा उपक्रम हाती घेतला होता. मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही. आता या यंत्राची मागणी वाढली आहे.


कृषी विभाग आणि भोर पंचायत समितीमार्फत गावा गावात आत्मा उपक्रम राबविण्यात येतोय. या लागवडीत लावण्यात येणारे भाताचे रोप हे कृषी विभाग देतं. वेळ आणि कमी खर्चात शेतकऱ्याने भात पीक घ्यावे या करीत हा उपक्रम राबवण्यात येतोय. या यंत्रामुळे फायदा होत असल्याने जास्तीत जास्त शेतक-यांनी भात लावणी करावी असं आवाहन करण्यात येत आहे.