नाशिकमध्ये खास मिसळ खाण्यासाठी जाणाऱ्या खवय्यांसाठी बॅड न्यूज
नाशिकमध्ये जाऊन मिसळ खाणं आता महागात पडणार आहे.
नाशिक : नाशिकमध्ये खास मिसळ(nashik misal) खाण्यासाठी जाणाऱ्या खवय्यांसाठी बॅड न्यूज आहे. नाशिकची झणझणीत तर्रीदार मिसळ खाणाऱ्यांना आता महागाईचा ठकसा लागणार आहे. नाशिकमध्ये मिसळपाव, वडापाव(Misalpav, vadapav) महागणार(expensive) आहे. वाढत्या महागाईचा फटका हॉटेल व्यवसायाला देखील बसला आहे. यामुळे नाशिकमधील व्यावसायीकांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 10 नोव्हेंबरपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.
सध्या पेट्रोल डिझेलसह कच्चा मालाचे दर देखील वाढले आहेत. यामुळेच पाव बेकरी व्यवसायीक संघटनेने तीस टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 नोव्हेंबरपासून ही दरवाढ लागू होणार असल्याने खवय्यांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
मिसळला महागाईचा फटका
नाशिक शहर पाव बेकरी संघटनेने हा निर्णय जाहीर केला आहे. पाव तयार करण्यासाठी लागणारा मैदा, काम करणाऱ्या मजुरांची मजुरी तसेच सर्व महागाई वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
नाशिकमध्ये दररोज 4 ते 5 लाख पाव खपतात
विशेष म्हणजे सर्वाधिक पावाचे उत्पादन आणि खप ही नाशिकमध्येच होते. नाशिकमध्ये दररोज सरासरी 4 ते 5 लाख पाव फस्त केले जातात.
नाशिकची मिसळ चांगलीच प्रसिद्ध आहे. नाशिक मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ मिळतात. अनेक पर्यटक मिसळचा आस्वाद घेण्यासाठी नाशिकमध्ये येत असतात. यामुळेच नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मिसळची दुकाने पहायला मिळतात. सर्वच दुकांनामंध्ये खवय्यांची नेहमीच मोठी गर्दी पहायला मिळते. आता या महागाईचा फटका मिसळ प्रेमींना देखील बसणार आहे.