पुणे : पुण्यात खातेदारांना फसवणाऱ्या बँकेची तोडफोड करण्यात आली आहे. चंदगड अर्बन निधी बँकेनं कर्जाचं आमिष दाखवून गरजू खातेदारांची तब्बल ७ कोटींची फसवणूक केली आहे. साडेपाचशे खातेदाराची यात फसवणूक करण्यात आली आहे. कर्ज देण्यासाठी बँकेनं प्रत्येक खातेदाराकडून २० ते ४० हजार रुपये वसुल केले होते. कर्ज मिळण्याच्या आशेपोटी या खादेदारांनी अक्षरश: व्याजानं पैसे काढून बँकेची कर्ज पॉलिसी काढली होती. या खातेदारांनी कर्जासाठी तगादा लावताच बँकेच्या पुण्यातील शाखेनं कार्यालय बंद करुन पोबारा केला. त्यामुळे संतप्त खातेधारकांनी बँकेच्या कार्यालयाची तोडफोड केली.


पुण्यात आणखी एक बँक घोटाळा उघडकीस आला आहे. चंदगड अर्बन निधी बँकेने कर्ज देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. पण कारवाई होत नसल्याने कर्जदार आपल्या हक्काच्या पैशांसाठी बँकेच्या दारात बसून आहेत. किमान आपल्या हक्काचे पैसे तरी मिळावेत अशी मागणी या कर्जदारांकडून होते आहे.