vande bharat express mumbai to solapur and mumbai sainagar shirdi timings tickets rate schedule: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई-सोलापूर तसेच मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. भारतीय रेल्वेची 9 वी आणि 10 वी वंदे भारत एक्सप्रेस सिद्धेश्वर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थस्थांनाना जोडणार आहे. पंतप्रधान मोदींनी या गाड्यांना आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी स्थानकावरुन हिरवा झेंडा दाखवला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी-हाय स्पीड एसी चेअर कार ट्रेनची सेवा आहे.


हे आहेत वंदे भारतचे टायमिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) ट्रेनचा क्रमांक 22223 हा आहे. मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीवरुन पहाटे 6 वाजून 20 मिनिटांनी रावाना होईल. 5 तास 20 मिनिटांच्या प्रवासानंतर सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी ही ट्रेन शिर्डीला पोहचेल. या गाडीचे थांबे दादार, ठाणे आणि नाशिक रोडला असतील.


2) परतीच्या ट्रेनचा क्रमांक 22224 असा आहे. साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस साईनगर शिर्डी स्थानकावरुन सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी निघेल. त्यानंतर 5 तास 25 मिनिटांच्या प्रवासानंतर 10.50 ला मुंबईला पोहचेल. 


3) मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईला महाराष्ट्रातील तीर्थस्थानं असलेल्या नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डीशी जोडणार आहे.


4) ट्रेन क्रमांक 22226 सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सोलापूरवरुन पहाटे 6 वाजून 5 मिनिटांनी निघेल. त्यानंतर 6 तास 30 मिनिटांनी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी मुंबईला पोहचेल. कुर्दीवाडी, पुणे, कल्याण आणि दादर स्थानकांमध्ये या ट्रेनला थांबे असतील. 


5) ट्रेन क्रमांक 22225 मुंबई-सोलापूर वंदे एक्सप्रेस सीएसएमटी सायंकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी निघेल. 6 तास 35 मिनिटांच्या प्रवासानंतर रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी सोलापूरला पोहचेल. दोन्ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावतील.


भाडं किती?


1) मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कार सीट डब्ब्यांमधील प्रवासासाठी अनुक्रमे 975 रुपये आणि 1840 रुपये मोजावे लागतील. या भाड्यामध्ये जेवणाच्या पैशांचा समावेश आहे.


2) जर तुम्ही ऑन बोर्ड कॅटरिंगचा पर्याय निवडला नसेल तर तुम्ही चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 840 रुपये आणि 1670 रुपये मोजावे लागतील.


3) साईनगर शिर्डीवरुन साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं भाडं अनुक्रमे चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कारच भैड 1130 रुपये आणि 2020 रुपये असणार आहे. यामध्ये खाण्याच्या खर्चाचाही समावेश आहे.


4) ऑन बोर्डिंग कॅटरिंगची सेवा घेतली नाही तर चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कारचं भाडं अनुक्रमे 840 रुपये आणि 1670 रुपये असणार. 


5) मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 1300 रुपये आणि 2365 रुपये असमार आहे. यामध्ये खाद्यपदार्थांच्या खर्चाचाही समावेश आहे.


6) तुम्ही ऑन-बोर्ड कॅटरिंगचा पर्याय निवडला नाही तर मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 1010 रुपये आणि 2015 रुपये मोजावे लागतील.


7) सोलापूरवरुन सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं भाडं चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 1150 रुपये आणि 2185 रुपये असणार आहे. यात खाण्याच्या खर्चाचाही समावेश आहे.


8) कॅटरिंगशिवाय सोलापूर-मुंबई एक्सप्रेसचं भाडं चेअर कार आणि एक्झिक्युटीव्ह चेअर कारचं अनुक्रमे भाडं 1010 रुपये आणि 2015 रुपये असेल.


शेड्यूल कसं?


भारतीय रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरबरोबरच पंढरपूर आणि पुण्याजवळच्या आळंदीसारख्या तीर्थ क्षेत्रांना वेगवान कनेक्टीव्हीटी देणार आहे. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा दीड तास वाचवणार आहे. सध्या या मार्गावर जर्वात जलद ट्रेन प्रवासाठी 7 तास 55 मिनिटांचा वेळ घेते.