Pune Vande Bharat Express: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या पुण्यातून दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. मात्र लवकरच पुणे शहराला चार वंदे भारत एक्स्प्रेसचे गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळं आता चार मोठी शहरे पुण्याच्या जवळ येणार आहेत. म्हणजेच येत्या काही दिवसांत पुण्याला सहा वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यामुळं पुणेकरांचा प्रवास सुलभ आणि आरामदायक होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंदे भारत एक्स्प्रेस ही भारताची प्रीमियम ट्रेन आहे. आरामदायी आणि जलद प्रवास यामुळं वंदे भारत एक्स्प्रेसची निवड अनेकजण करतात. मुंबई आणि पुणे प्रवास रस्तेमार्गे करताना 3 ते 3.30 तासांचा वेळ लागतो. तसंच, ट्रेनने जायलादेखील तितकाच वेळ लागतो. या तुलनेत वंदे भारत ट्रेनने प्रवाशांचा वेळ वाचतो. तसंच, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यातून मुलं पुण्यात शिकण्यासाठी येतात. तसंच, आता पुणे आयटी हब म्हणूनही ओळखू लागले आहे. त्यामुळं नोकरीसाठी येणाऱ्या तरुणांची संख्याही अधिक आहे. त्यामुळं पुण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस वाढल्यास नागरिकांना फायदा होणार आहे. 


18 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे प्रशासनाने पुण्याहून 4 नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची घोषणा केली होती. आता या ट्रेन लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यामुळं पुणे शहराची कनेक्टिव्हीटीदेखील वाढणार आहे. या चार वंदे भारत एक्स्प्रेस पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद, पुणे-बेळगाव या मार्गांवर धावणार आहेत. मात्र या वंदे भारत एक्सप्रेस कधीपासून धावणार याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. पण लवकरच या 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची शक्यता आहे. 


सध्या पुण्याहून हुबळी आणि कोल्हापूरसाठी अशा 2 वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापूर स्थानकावरून सुटते. दुपारी दीड वाजता ही गाडी पुणे स्टेशनवर पोहोचते. तर पुण्यावरून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार दुपारी ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटते आहे ती सायंकाळी 7:40 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानाकावर पोहचते. वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आठ कोच आहेत. कोल्हापूर-पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी 1160 रुपये तर एक्झिक्युटिव्हसाठी 2005 रुपये असं तिकिट आहे. वंदे भारतमुळं कोल्हापूरकरांचा प्रवास 5 तासांत प्रवास पूर्ण होणार आहे. 


पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस


पुणे-हुबळी वंदे भारत गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी धावते. ही ट्रेन पुण्यातून दुपारी 2.15 वाजता सुटेल, सांगलीत 6.10 ला, बेळगावला 8.34, धारवडला 10.30 पर्यंत पोहोचते. हुबळीत रात्री 10.45 ला पोहोचते. तर, परतीच्या प्रवासात हुबळी-सांगली-पुणे अशी ट्रेन धावते. ही ट्रेन दर बुधवार, शुक्रवार, रविवारी हुबळीहून पहाटे 5 वाजता सुटते. तर, धारवाडला पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी येते. बेळगावात सकाळी 6.55, सांगली 9.30 आणि पुण्यात 1.30 वाजता पोहोचते.