वांगणी : रेल्वेच्या पॉइंटमने (Railway Pointsman) चिमुकल्‍याचे प्राण वाचवण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) वांगणी( Vangani Railway Station)स्थानकावरील ही घटना आहे. शनिवारी एक अंध महिलेल्या हातून सुटलेल्या तिच्या बाळाचे प्राण रेल्वे पॉईंटमनमुळे वाचले. वांगणी रेल्वे स्थानकावरील फलाटावरुन अंध महिला आपल्या मुलाचा हात धरुन चालत होती. अचानक तिच्या उजव्या बाजुला असलेल्या ट्रॅकवर तिचा लहान मुलगा जाऊ लागला. आणि काही कळण्याच्या आत तिचा लहान मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचवेळेस 5 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास उद्यान एक्सप्रेस (Udyan Express) रेल्वे स्थानकावर येत होती. घाबरलेली अंध महिला आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. मात्र तिला फलाटाचा अंदाज येत नसल्याने ती चाचपडत होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चित्रीत झालंय. 



त्याच वेळेस ड्युटीवर असलेला पॉइंट मयूर शेळके हा ट्रॅकमधून तिथे धावत आला आणि त्याने क्षणार्धात त्या मुलाला फलाटावर उचलून स्वतःही फलाटावर गेला. अक्षरशः काही सेकंदाच्या मयूर शेळके यांच्या सतर्कतेमुळे या मुलाचे प्राण वाचले. जीवावर उदार होऊन मयूर शेळके याने या चिमुकल्याचे प्राण वाचवले.