प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगावमध्ये (Naigaon) लैंगिक अत्याचाराची अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. नायगावमधल्या एका नामांकित शाळेच्या कँटिनमध्ये (School Canteen) काम करणाऱ्या 16 वर्षांच्या विधिसंघर्षग्रस्त मुलाने 7 वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे चार ते पाच वेळा त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexually Assaulted) केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना उघडीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पीडित मुलगी या शाळेत दुसर्‍या इयत्तेत शिकते. 22 ऑगस्टला शाळेतील सर्व मुलं कँटिनमध्ये गेली. पण पीडित मुलगी कँटनमध्ये जाण्यास घाबरत होती. याबाबत शिक्षिकेन तिला विचारला असंत कँटिनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो असं तिने शिक्षेकाल सांगितला. यामुळे हादरलेल्या शिक्षकेने हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितला. त्यांनी पीडित मुलीला विश्वासत घेत नेमकं काय झालं याबाबत विचारणा केली.


'कँटिनमधला अंकल त्रास देतो'
गेल्या 15 दिवसांपासून शाळेच्या आवारात उपहारगृह (कॅंटीन) मध्ये काम करणारा16 वर्षांचा मुलगा लैंगिक अत्याचार करत असल्याचं तिनं मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सांगितलं. विशेष म्हणजे एकदा मुलीने आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती. पण घरच्यांनी तिचं म्हणणं गांभिर्याने घेतलं नाही.  प्रकरणाचं गांभीर्य ओळखत मुख्याध्यापकांनीत याबाबतची माहिती तात्काळ नायगाव पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळातीच पोलिसांनी आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुलाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.


वाशिममध्ये अपहरण करुन बलात्कार
राज्यात अल्पवयीन मुलींवर होण्याऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 21 ऑगस्ट रोजी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून 3 आरोपी विरुद्ध रिसोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काल 23 ऑगस्ट रोजी वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर गुन्ह्यात वाढ करून आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तीनही नराधम आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयात हजर केलं. आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात अली असल्याची माहिती वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली