वसई : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेचे ७०० कर्मचारी १४ ऑगस्टपासून संपावर आहेत. आज तिसऱ्या दिवशीही हा संप सुरूच आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपकरी कर्मचारी डेपोच्या गेटवर ठाण मांडून बसले आहेत. मात्र, महापालिकेचा कोणीही अधिकारी, परीवहनचा ठेकेदार चर्चेसाठी आलेले नाहीत. २० हजार रूपये पगारवाढ मिळावी, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.


ठेकेदाराने संप करणाऱ्या ५० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. ठेकेदारांनी कामगारांची दिशाभूल केल्याचा आरोप कामगारांनी केलाय. प्रत्यक्षात १० ते ११ हजार रूपये पगार देण्यात येत असून १५ ते १७ हजार रुपये पगार देत असल्याचं दाखवलं जात असल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.


या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. या आधीही कामगारांनी दोनदा संप केला होता. मात्र, त्यांची आश्वासनावर बोळवण करण्यात आली... आता तोडगा न निघाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा कामगारांनी दिलाय.