Maharastra Politics: हिम्मत असेल तर `या` आमदाराला विरोधी पक्षनेता करा; राजकीय गोंधळात वसंत मोरेंनी ठोकले शड्डू!
Maharastra Politics, Vasant More: राजकीय गोंधळात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वांना चपराक लगावली. अशातच आता मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील ट्विट करत सर्वांना सनसनीत टोला लगावली आहे.
Vasant More On NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारलं आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची पाचव्यांदा शपथ घेतली. त्यानंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) वातावरण तापल्याचं पहायला मिळतंय. जयंत पाटील यांनी अजित पवार आणि इतर 9 आमदारांवर कारवाईला बडगा उगारला आहे. राज्याच्या या राजकीय गोंधळात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वांना चपराक लगावली. अशातच आता मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील ट्विट करत सर्वांना सनसनीत टोला लगावली आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
राज्यात 2019 ते 2023 या 4 वर्षांत झालेल्या राजकीय खेळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजितदादा पवार 3 वेळा उपमुख्यमंत्री, 1 वेळा विरोधीपक्षनेता, देवेंद्र फडणवीस 1 वेळ मुख्यमंत्री, 1 वेळ विरोधी पक्षनेता 1 वेळ उपुख्यमंत्री आणि आता थोड्याच दिवसात कदाचित पुन्हा मुख्यमंत्री, आता वर्षभर झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
आता परत जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेता. अरे म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राची सत्ता आपापसात वाटून घेताय का? सत्ताधारी तुम्हीच आणि विरोधी पक्षात पण तुम्हीच. हिम्मत असेल तर मनसेच्या या विधानसभेतील वाघाला किमान एकदा विरोधी पक्षनेता करा, मग तुम्हाला कळेल विरोधी पक्षनेत्याची दहशत काय असते, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
पाहा ट्विट -
राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र यावं, अशी मागणी केली जात आहे. मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपलं म्हणणं बोलून दाखवलं आहे. अशातच आता दोन्ही नेते एकत्र येणार का? असा सवाल विचारला जात आहे.
आणखी वाचा - 'आज आबा असते तर...'; अजितदादांच्या बंडानंतर रोहित पाटलांची भावनिक साथ; पाहा Video
दरम्यान, यशवंतराव चव्हाण आज नसले तरी त्यांचे विचार तुमच्या माझ्या मनात आहेत अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याद्वारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे पक्षविरोधी कारवायांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे, असे शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.