वसुंधरा वाहिनी बारामतीतर्फे उखाणा स्पर्धेचे आयोजन
वसुंधरा वाहिनी रेडियो केंद्रामार्फत उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही ही उखाणा स्पर्धा रविवार दि ८ आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.
बारामती : वसुंधरा वाहिनी रेडियो केंद्रामार्फत उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही ही उखाणा स्पर्धा रविवार दि ८ आक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकास दोन उखाणे घेणे बंधनकारक राहणार आहे. त्या दोन उखाण्यांपैकी एक पारंपारिक व एक पर्यावरण विषयावर असणे आपेक्षीत आहे. सादरीकरण, आषय, दिलेला संदेश, तसेच प्रेक्षकावरील प्रभाव या निकषांवर आधारीत स्पर्धकाचे मुल्यांकन केले जाईल.
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक साड्या बक्षीस स्वरूपात दिल्या जातील अशी माहिती वसुंधरा वाहिनी महिला मंच समन्वयिका राजश्री आगम यांनी केले आहे.