डोंबिवली : येथील स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरच्या तिसऱ्या माळ्याला आज दुपारी अचानक भीषण आग लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या इमारतीत काही कुटुंबीय राहत होते. मात्र परिसरातल्या रहिवाशांच्या मदतीने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


या आगीवर अजूनही नियंत्रण मिळालेले नाही. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या आणि ४ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.