सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड: राजकीय क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे 102 व्या वर्षी निधन (Keshavrao Dhondge Passes Away) झाले आहे. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शेकापचे जेष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे आज दुपारी औरंगाबाद येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून धोंडगे यांची प्रकृती ठीक नसल्याने श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (vetern politician bhai keshavrao dhongde passes away)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड जिल्ह्यातील कंधार मधून भाई केशवराव धोंडगे हे सहावेळा आमदार आणि एक वेळा खासदार होते. विधानसभा आणि संसदेत त्यांची भाषणे गाजली होती. तीन महिन्यांपूर्वीच विधीमंडळात केशवराव धोंडगे यांचा गौरव करण्यात आला होता. वृद्धापकाळामुळे रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रात तसेच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.  


केशवराव धोंडगे यांची राजकीय क्षेत्रातील कारकीर्द (politics news) प्रचंड आहे. त्यांची राजकीय वाटचाल अनेक रोमाचंकारी प्रसंगानी भरलेली आहे. विधिमंडळाच्या सदस्य परिचय पुस्तिकेच्या आधारावर त्यांचा जन्म 25 जूलै 1922 साली झाला आहे. भाई केशवराव धोंगडे यांचा विधानभवनात मान्यवरांच्या हस्ते गौरवही करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात एका लहानश्या गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली होती. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत काम केले. त्यांची विधानसभेतील आणि संसदेतील भाषणं गाजली आहेत. त्याचबरोबर त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधानसभा आणि संसदेत मांडले. त्यांच्या कर्तृत्वाची, भाषा प्रभुत्वाची आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची सगळ्यांवरच छाप पडली होती. 


1957 पासून ते 1995 पर्यंत ते विधिमंडळात सदस्य होते. 1977 मध्ये ते खासदार (mp) होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या त्यांचे मोठे योगदान आहे. राज्याच्या 11 मुख्यमंत्र्यांसोबत काम करणारे ते राज्यातील एकमेव माजी आमदार असावेत. केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. गेल्यावर्षी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 


डॉ. केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील आणीबाणी विरोधी लढा दिला आहे. त्यांनी अनेक आंदोलने आणि सत्याग्रहही केली आहेत.