Vidarbha Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi : लोकसभा निवडणूक 2024 (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) प्राथमिक कल येत आहेत. त्यात भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भात फडणवीस यांना धक्का मानला जातोय. नागपूर मतदारसंघात भाजप नेते आणि मंत्री नितीन गडकरी यांनी हॅटट्रिक केली. यापूर्वी काँग्रेसचे विलास मुत्तेवार यांनी हॅटट्रिक केली होती. पण विदर्भातील इतर मतदारसंघात मात्र भाजप आपली जादू दाखवताना दिसत नाहीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भातील दहा मतदारसंघापैकी नागपूर आणि बुलढाणा हे मतदारसंघ सोडले तर 8 मतदारसंघात महा विकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. 


1. गडचिरोली चिमूरमधून काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे अशोक नेते यांचा 1 लाख 23 हजार मतांनी पराभव केलाय. अशोक नेते यांची विजयाची हॅटट्रीक रोखण्यात किरसान यांना यश आलंय. 10 वर्षानंतर गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने गुलाल उधळलाय.


2. बुलढाणा - महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव 16368 मतांनी आघाडीवर 


3. चंद्रपूर - काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 1 लाखांची आघाडी, भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर


4. अकोला - काँग्रेसचे डॉ.अभय पाटील दहाव्या फेरी 11859 मतांनी आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर


5. यवतमाळ वाशिम - शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख 37894 मतांनी आघाडीवर, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील पिछाडीवर
6. वर्धा -  अमर काळे 36894 मतांनी आघाडीवर 
अमर काळे यांना 267912 मत तर रामदास तडस यांना 231018 मतं


7. अमरावती - काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे 31338 मतांनी आघाडीवर

बळवंत वानखडे यांना आतापर्यंत मिळाले 271246 मतं

नवनीत राणा यांना आतापर्यंत मिळाले 239908 मतं

नवनीत राणा यांना पुन्हा मोठा धक्का

बळवंत वानखडे यांची विजयाकडे वाटचाल


8. भंडारा गोंदिया - काँग्रेस प्रशांत पडोळे 1465 मतांनी आघाडीवर


काँग्रेस -  प्रशांत पडोळे - 149768
भाजपा - सुनिल मेंढे 148303
काँग्रेसने 1465 मतांनी आघाडी 


9. रामटेक - शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर