अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : हल्ली गाडी चालवणंही धोक्याचं झालेलं (Car and Safety) पाहायला मिळते आहे. रस्त्यावर वेगवान गतीनं गाड्या चालवण्याचे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही वेळोवेळी काळजी घेणेही आता बंधनकारक झाले आहे. सध्या आपण पाहतोय की सगळीकडेच गाड्या चालवताना (Car and Road Safety) हलगरीपणा केला जातो आहे. त्यामुळे नागरिक तर त्रस्त आहेतच परंतु यामुळे व्यवस्थित वाहनं (Car Videos) चालविणाऱ्यांच्याही डोक्याला ताप झाला आहे. प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे. (video car jump on a railway track at Dhamangaon railway station)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सगळीकडे व्हायरल होतो आहे. जो पाहून तुमचाही पारा चढल्याशिवाय राहणार नाही. सध्या या व्हिडीओमुळे (Viral Video) सगळीकडेच खळबळ माजली आहे. एका कारनं चक्क कोलांटी उडी घेत जबरदस्त स्टंटबाजी केली आहे. परंतु ही स्टंटबाजी काही मुद्दामून किंवा जाणूनबूजुन केलेली नसून चुकून अपघातानं हा प्रकार घडला आहे. हा प्रकार सध्या सगळीकडे व्हायरल झाला असून या प्रकारानं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे आणि त्यामुळे सध्या वाहन सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 



हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


काय घडला नेमका प्रकार? 


अमरावतीच्या धामणगाव रेल्वे स्थानकावर विचित्र घटना घडली असून क्लच (Cluch) ऐवजी एक्सलेटरवर (Acceletor) पाय पडल्याने चक्क रेल्वे स्टेशन वरील रेल्वे रुळावर कार आदळल्याची घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी रेल्वे सुरक्षा दलाच्या (Police) कर्मचाऱ्याला ही बाब तात्काळ लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरून गाडी काढत असताना त्या कर्मचाऱ्याचा ब्रेक (Break) ऐवजी एक्सलेटर वर पाय पडल्याने कार चक्क प्लॅटफॉर्मवरून हवेत उडी घेत रेल्वे रुळावर आदळली. मुंबई नागपूर रेल्वे मार्गावर (Railway) कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे काही काळ रेल्वे सेवा खोळंबली होती मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही कार रेल्वे रुळावरून बाजूला केली त्यानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली.