VIDEO: समुद्र किनाऱ्यावर अचानक आली मगर आणि मग...
समुद्र किनाऱ्यावर तुम्ही फिरायला गेला असाल आणि त्यावेळी मोठ-मोठे मासे तुम्ही पाहीले असतील. पण, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना अचानक मगर आली तर?
दापोली : समुद्र किनाऱ्यावर तुम्ही फिरायला गेला असाल आणि त्यावेळी मोठ-मोठे मासे तुम्ही पाहीले असतील. पण, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना अचानक मगर आली तर?
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
रत्नागिरी जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार घडला आहे. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर नेहमीप्रमाणे पर्यटक फेरफटका मारत होते. मात्र, त्याच दरम्यान अचानक महाकाय मगर समोर आली आणि सर्वांनाच एक धक्का बसला.
समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मजा मस्ती करत होते. कुणी संध्याकाळच्या वातावरणाची मजा घेत होतं, कुणी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत होतं. पण त्याचवेळेस अचानक समोर मगर आली. सुरुवातीला कुणाचाच विश्वास बसला नाही मात्र, नंतर सर्वांनाच एक धक्का बसला.
आपल्या समोर मगर आल्याने नेमकं काय करावं हे पर्यटकांना कळत नव्हतं. पाण्यातून बाहेर आलेली मगर काहीकाळ समुद्र किनाऱ्यावर बसुन राहीली. यानंतर स्थानिकांनी प्रशासनाला यासंदर्भातील माहिती दिली.
नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मग, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न करुन त्या मगरीला जाळ्यात पकडलं.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडल्यानंतर तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मगर मोठी असल्याने ती जाळी तुटली त्यामुळे मगर जाळीतून बाहेर पडली आणि पून्हा समुद्रात शिरली.
मगर समुद्रात पून्हा परत गेल्यानंतर पर्यटकांना दिलासा मिळाला. ही संपूर्ण घटना तेथे उपस्थित पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.