विष्णु बर्गे, झी मीडिया, बीड : कोरोना (Corona) काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) सर्वच काही ठप्प झालं होतं. मात्र मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा (Online Education) पर्याय सुरु करण्यात आला. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेता आले. याचा फायदा झाला की तोटा हा वेगळा विषय आहे. मात्र मुलांना यामुळे मोबाईलचे व्यसन लागली अशी ओरड सातत्याने केली जातेय. मुले मोबाईलचा सातत्याने वापर करत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यावरुनच प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivritti Indurikar Maharaj) यांनीही आपल्या कीर्तनातून भाष्य केले असून याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं माजलगावात कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण कसे झाले याबाबत इंदोरीकर यांनी भाष्य केले. यावेळी कीर्तनकार इंदोरीकर यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुलांनी दिलेली उत्तर ऐकून सर्वांनाच हसू अनावर झालं. इंदोरीकर यांच्या कीर्तनकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


"ऑनलाईन शिक्षण सुरु असतानाही तुम्ही गाणी ऐकत होतात. ऑनलाईन शिक्षण सुरु असताना तुम्ही गेम खेळत होतात. तुम्हाला यामुळे मोबाईलचा नाद लागला आहे. मोबाईल शिवाय तुम्ही जगू शकत नाही. त्यामुळे डोळे, झोप गेली," असे इंदुरीकर म्हणाले. इंदुरीकर यांनी झोप येत नाही म्हणून क्वार्टर सुरु... असे म्हणताच मुलांनी केली असे जोरात म्हटले. त्यामुळे उपस्थितांना हसू अनावर झाले. यावेळी मुलांनी मद्यपानासोबतच्या गोष्टींबाबतही भाष्य केले. यावेळी मुलांनी सर्वच चकण्याची माहिती देखील दिली.


राज्यातील सत्तातरांबाबतही इंदुरीकर यांचे भाष्य


राज्यात झालेल्या सत्तातरांवर इंदुरीकर महाराज यांनी गेल्या वर्षी भाष्य केले होते. जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी मिश्किल टिप्पणी केली होती. "नुसत्या लोभ नावाच्या शब्दासाठी आख्खी मंडळी १५ दिवस एकत्र आली. विरोधक एकत्र आले. सगळे एकत्र आले. कुणाचीही हू नाही, चू नाही. आणि आपल्या गावातला पुढारी म्हणत राहातो 'मी गेलो असतो लग्नाला पण तो आपल्या पार्टीत नाही'. शिका त्यांच्याकडून. आता म्हणेल का कुणी की हा विरोधक आहे? तुम्ही बसा गावात बांध कोरत. तुमची तर किंमतच संपली. तुमचं काही राहिलंच नाही", असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते.