VIDEO : बीडमध्ये मुंडे बंधु-भगिनी एकमेकांसमोर येतात तेव्हा...
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांना या कार्यक्रमाचे निमंत्रण होते
परळी, बीड : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे या बहीण भावातील हाडवैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र परळीतल्या एका कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आले अन् उपस्थितांना सुखद धक्का बसलाय. परळीतल्या आबासाहेब वाघमारे यांच्या 'अमृत महोत्सव' निमित्त हे दोघे बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मात्र दोघांनीही एकमेकांवर बोलणे टाळले हे विशेष...
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांना या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. हे दोघेही कार्यक्रमास हजर होते. मात्र त्यांच्यातील व्यासपीठावरील अंतर सुरक्षित राहील, याची काळजी आयोजकांनी घेतल्याचं दिसून आले.