तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताराचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात सध्या सुरू असलेला वाद उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु, आज साताऱ्यात जावळी तालुक्यातील कुडाळ या छोट्याशा गावी अनपेक्षितरित्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने आले. कुडाळ इथल्या एका मंदिराच्या कार्यक्रमानिमित्तानं हा योगायोग घडून आला. हे दोघं थेट समोरा-समोरच आल्यानंतर उपस्थितही क्षणभर थांबून या दोघांकडेच पाहत राहिले. यावेळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघंही हसतमुखानं एकमेकांना सामोरे गेले... असं असलं तरी शाब्दिक चिमटे काढण्याची संधी दोघांनीही सोडली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलता बोलता शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवला... त्यावेळी शिवेंद्रराजे यांनीही मोठया मनाने त्यांना दाद देत 'सारखा माझा खांदा का दाबताय?' असं म्हटलं. त्यावर उद्यनराजेंनीही हजरजबाबीपणे 'फिटनेस बघतोय' असा टोला मारला... यावर पुन्हा शिवेंद्रराजे यांनीही चाणाक्षपणे 'माझा फिटनेस कायम चांगला आहे... कधीही प्रात्यक्षिक दाखवण्याची तयारी आहे' असं म्हणत प्रत्यूत्तर दिलं.


त्यानंतर दोघेही हसत हसत वेगवेगळ्या मार्गानं निघून गेले... यावेळी, दोघांचेही कार्यकर्ते त्यांच्यासोबतच होते.   


व्हिडिओवर क्लिक करा...