पोलखोल : तुरुंगाच्या भिंतींच्या आत नेमकं काय घडतं, ऐका...

जेलच्या चार भिंतीच्या आत नेमकं काय घडतं? याबाबतचे धक्कादायक गौप्यस्फोट धुळे जेलमधील कॉन्स्टेबल अनिल बुरकुल यांनी शुक्रवारी केले.
नाशिक : जेलच्या चार भिंतीच्या आत नेमकं काय घडतं? याबाबतचे धक्कादायक गौप्यस्फोट धुळे जेलमधील कॉन्स्टेबल अनिल बुरकुल यांनी शुक्रवारी केले.
विविध तुरूंगांमध्ये बदली आणि बढत्यांमध्ये भ्रष्टाचार कसा चालतो, हे त्यांनी चव्हाट्यावर आणलं. जेल अधिकारी आणि कैदी यांच्यात नेमकं काय साटंलोटं असतं? नाशिक जेलमध्ये कैद्यांना मोबाईल कसे मिळतात? अंडा सेलमध्ये फोटोसेशन कसं चालतं? जेलमधील भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्यांवरच कारवाई कशी होते? याचा पाढाच बुरकुल यांनी झी मीडियाकडं वाचून दाखवला.
ऐका एका पोलीस अधिकाऱ्यानं केलेली ही पोलखोल...