नाशिक : विचार करा... आपण भररस्त्यात वेगाने गाडी चालवत आहोत. आणि अचानक आपल्या गाडीच्या काचेवर साप दिसतो. साप गाडीच्या काचेवरून फिरताना दिसतोय. अशा परिस्थितीत गाडी चालवण देखील कठीण होतं. अशीच घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील मुंबई आग्रा महामार्गावर घडली आहे. (VIDEO: When a snake comes on the glass of a running car) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर धावत्या कारवर लांबलचक धामण जातीचा साप रेंगाळत असताना दिसून आला. गाडी चालकाचा चांगला थरकाप उडाला. दोन किलोमीटर पर्यंत हृदयाचे ठोके चुकवणारा हा थरार पाहावयास मिळाला.



मात्र वाहन चालकाने मोठ्या हिंमतीने जवळच असलेल्या सर्विस सेंटर च्या दिशेने आपली कार आणून लोकांच्या मदतीने सर्प मित्राला बोलावण्यात आले. घटनास्थळी येऊन या सापाला पकडण्यास सर्पमित्राला यश आले आहे. त्यामुळे कार चालक रतनदीप यांनी या सर्व मित्रांचे आभार मानले, आणि सुटकेचा निःश्वास सोडला.