अलिबाग : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. अनिकेत तटकरेंनी नारायण राणेंच्या यावेळी पाया पडून आशीर्वाद घेतले. दरम्यान ही निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची झालेय. राणे यांनी शिवसेनेचा उमेदवार पराभूत करणार असा विडा उचलाय. राणेंकडे जवळपास ८५ मते आहेत. त्यामुळे तटकरे यांनी राणेंचे आशीर्वाद घेतल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था निवडणुकीत शिवसेनेच्‍या उमेदवाराचा पराभव करण्‍याची प्रतिज्ञा घेतलेले खासदार नारायण राणे रायगड जिल्‍हयातील पारंगखार येथे एका विवाह सोहळया निमित्‍त आले होते. यावेळी दोघांमध्‍ये काय गुप्तगू झाले याचा तपशील समोर आला नाही. या निवडणूकीत अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे  अॅड. राजीव साबळे यांच्‍यात सरळ लढत असून राणे यांच्‍या स्‍वाभीमान पक्षाची मतं निर्णायक ठरणार आहेत.