विधान परिषद निवडणूक : अमरावतीत भाजपचा काँग्रेसला दे धक्का
अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे अनिल माधोगढीया यांचा पराभव केला आहे.
अमरावती : विधान परिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे अनिल माधोगढीया यांचा पराभव केला आहे. भाजपने ही जागा आपल्याकडे राखली आहे.अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली. एकूण मतदान पैकी ४८८ वैध तर ४७५ मते बाद झालीत. १० जणांनी नोटाचा वापर केला. काँग्रेसचे अनिल माधोगढीया यांना केवळ १७ मते पडलीत. तर भाजपचे विजयी उमेदवार प्रवीण पोटे यांनी ४५८ मते मिळालीत.