विधान परिषद निवडणूक : सुरेश धस यांचा अर्ज दाखल
![विधान परिषद निवडणूक : सुरेश धस यांचा अर्ज दाखल विधान परिषद निवडणूक : सुरेश धस यांचा अर्ज दाखल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/05/03/286801-sureshdhassged.jpeg?itok=hue_557L)
कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर अनुपस्थित असल्याने उलट सुलट चर्चेला सुरवात झाली आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद विधान परिषद निवडणुकीमधील उस्मानाबाद - बीड - लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपच्या वतीने माजी मंत्री सुरेश धस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुनील गायकवाड, आमदार सुजित ठाकूर, आमदार भीमराव धोंडे सह इतर नेते मंडळी उपस्थित होते. परंतु कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर अनुपस्थित असल्याने उलट सुलट चर्चेला सुरवात झाली आहे.