महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आता सगळ्यांचं लक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाकडे. लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली पण आता मात्र या आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण पदवीधर मतदासंघावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.. कोकण पदवीधर मतदासंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. एकीकडे काँग्रेसनं रमेश किर यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाकडून आज किशोर जैन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विधान परिषदेच्या इतर जागा महाविकास आघाडी एकत्र लढत असताना  कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी धर्म पाळला जात नसल्याचं दिसत आहे. 


मनसेने मात्र या कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता अभिजीत पानसे आज उमेदवारी अर्ज भरणार होते. पण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. 


विधान परिषदेची निवडणूक कशी पार पडणार? 


31 मे रोजी  विधान परिषदांच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. तर 7 जूनपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. आज त्याचा शेवटचा दिवस आगे. अर्जाची छाननी 10 जून रोजी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जून आहे. 26 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. 


चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार?


विलास विनायक पोतनीस - मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
निरंजन वसंत डावखरे - कोकण पदवीधर (भाजप)
किशोर भिकाजी दराडे - नाशिक शिक्षक  (ठाकरे गट)
कपिल हरिश्चंद्र पाटील - मुंबई शिक्षक (लोकभारती)