बारामती : एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे अशी शिवसेना दूतोंडी मांडूळ आहे असे आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्याच आरोपांना उत्तर देतांना बारामतीत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती असून या अजगरामुळेच पूर्ण शेतकऱ्यांची अडचण झाली असल्याचा आरोप करत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.


200 आमदारांचा पाठिंबा असूनही सध्याचं राज्य सरकार सर्वात दुबळं सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्य सरकार फक्त झाडं लावत असून, त्यांनी लावलेली झाडं किती जगतील याबाबत शंका असल्याचं अजित पवार म्हणाले. झाडं लावतानाच शिवसेना भाजप जवळ येतात, एरवी ते एकमेकांना पाण्यात बघतात, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला होता.