`गुजरातच्या लँड माफियांसाठीच सरकारने नाणारच्या रिफायणरीचा घाट घातला`
गुजरातच्या भू माफियांची नावं खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केली.
राजापूर : राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार पंचक्रोशीत जमीन खरेदी केलेल्या गुजरातच्या भू माफियांची नावं खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केली. १११ शहा मंडळींनी इथं जमीन खरेदी केली आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार इथल्या प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेची डोंगर तिठा गावात सभा झाली.
सरकारने घातला घाट
गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
मंत्रिपद मिळालं असत तर..
दरम्यान राऊत यांनी यावेळी नारायण राणेंचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नारायण राणे रिफायनरी विरोधातला सूर आवळत आहेत.
जर मंत्रिपद मिळालं असतं तर त्यांनी विरोध केला नसता. अशा शब्दात राऊत यांनी राणेवर टीका केलीय.