औरंगाबाद : दोन गटातील वादानंतर शहरात जाळपोळ आणि दगडफेक झाली. रात्रभराच्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या सत्रानंतर आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मध्यरात्री झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये  दोघांचा मृत्यू झालाय. त्यात एका वृद्ध दिव्यांग इसमाचा समावेश आहे. दगडफेकीत तीस जण जखमी झालेत. शहराच्या गांधीनगर, राजाबाजार आणि शहागंज परिसरात सध्या कमालाची तणाव आहे. शहरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 दोन समाजात संघर्ष उफाळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी किरकोळ भांडण होऊन मध्यरात्रीनंतर हा वाद उफाळला. दंगलखोरांनी शहरातील जवळपास १०० दुकानं पेटवून दिलीत. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू असून दंगलग्रस्त भागात तणावपूर्ण शांतता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. 



दरम्यान, पोलिसांच्या मते सध्या स्थिती नियंत्रणात आहे. तर शिवसेनेच्या मते परिस्थिती हाताळण्यात पोलिसांना सपशेल अपयश आलंय. तसा आरोप  खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय.