नवी मुंबई : सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी रस्तारोको करण्यात आले. काही ठिकाणी गाड्यांची जाळपोळ, तोडफोड करण्यात आली. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी मध्यरात्रीपासून शहरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत होते. त्यावेळी काकासाहेब शिंदे या मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांने जलसमाधी घेतली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्च्याचे आंदोलनाचे पडसाद राज्यात दिसून आले. काल नवी मुंबईमध्येही हिंसक वळण लागले. कळंबोली, कोपरखैराने येथे जाळपोळीच्या घटना घडल्यात. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. तसेच आज दुसऱ्या दिवशीही परिसरात तणाव दिसून आलाय. त्यामुळे कोणतीही अफवा पसरु नये यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.



२५ जुलै रोजी नवी मुंबई , मुंबई , ठाणे , पालघर आणि रायगड या ठिकाणी ठोक आंदोलनचे आयोजन करण्यात आले होते . मराठा क्रांती मूक मोर्च्याचे राज्यात जवळपास ५८ मोर्चे शांततेत काढले. मात्र, मराठा आरक्षणाबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यातच काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर हे आंदोलन आणखी  तीव्र झाल्याचे पाहावयास मिळाले. कळंबोली येथे पोलिसांची तीन वाहने पेटून देण्यात आली. सायंकाळपर्यंत ही धुमचक्री अशीच सुरु होती. रात्री उशिरा हा महामार्ग सुरळीत सुरु करण्यात आला.



मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने काल नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. ऐरोली , घणसोली , कोपरखैरणे , वाशी , नेरूळ, पाम बीच महामार्ग , कळंबोली आदी ठिकाणी आंदोलकांनी रस्ता वाहतूक अडवून धरली. दुपारनंतर मराठा संघटनांच्या समन्वयक असलेल्या नेत्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले तरीही आंदोलन सुरुच राहिले होते. यावेळी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. आंदोलनाचा भडका अधिकच उडाल्याचे दिसून आले. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. हवेत गोळीबारही केला. मात्र, आंदोलक मागे हटण्यास राजी नव्हते.


काल सकाळी घणसोली रेल्वेस्थानकात रेलरोको केला तीन तास ही सेवा बंद केली. कोपरखैरणे तीन टाकी चौकात आंदोलकांनी रस्त्याच्या मध्यभागी टायर जाळून चक्काजाम केले. ठाणे-बेलापूर रोडवर बस फोडण्यात आली. सायन-पनवेल महामार्ग सकाळ पासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रोखून धरला. तब्बल पाच तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांना लाठीचार करावा लागला. नेरूळमध्ये पाम बीच महामार्ग , नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर रस्ता अडवून आंदोलन करण्यात आले.


कळंबोलीतील कालची स्थिती