नवी मुंबईत साथीच्या रोगांचे थैमान
साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे.
नवी मुंबई : साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. पावसामुळे हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्याचसोबत डेंग्यू, मलेरिया, टायफाईडसारख्या आजारांनी डोके वर काढल्यामुळे महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
महानगरपालिकेच्या रुग्णालयात सध्या रोज दोन हजार साथिच्या रोगांचे रुग्ण येत आहेत. तर इतर २० नागरी आरोग्य केंद्रात तीनशेहून अधिक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे रुग्णालये भरली असून, नवीन येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.