viral video of old lady song : सध्या सोशल मीडियावर (social media) उत्कर्ष शिंदे (utkrsh shinde) याची एक पोस्ट पुन्हा व्हायरल होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोस्टमध्ये उत्कर्षने एका खास व्यक्तीविषयी लिहिलं आहे शिवाय एक स्पेशल व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.. उत्कर्षने हा व्हिडीओ शेअरक्रॅट म्हटलंय.. ''“आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय "


आजच्या रिऍलिटी शो च्या युगात कैक कलाकारांना वाव मिळतो.ते टीव्ही वर हि दिसतात पण काही असे हि कलाकार आहेत ज्यांना परिस्तिथी मुळे स्वतःला सादरच  नाही करता आल,त्यांच काय ?


अलिबाग वर आधारित एक गाणं करण्यासाठी मी अलिबाग मध्ये शूट साठी गेलो असता .एका सिन साठी अलिबाग च्या मच्छी मार्केट ला जाण झालं .


आणि तिकडेच मला भेटली एक मस्त मोला बाहुली सारखी नाचणारी गाणारी मासे विकणारी आजी.मला पाहताच जिने तू प्रल्हाद शिंदे -आनंद शिंदे च्या घरचो काय? असे विचारलं आणि अस विचारातच उत्साहाने गाणं सुरु केलं .


आणि मग काय मी पण माझी शूटिंग थांबवून त्या आजी कडचा लोककलेचा खजिना ऐकत पाहत राहिलो त्या आजीने भरभरून तिचे कोळीगीत तर ऐकवलेच


पण महान गायक विठ्ठल उमप व  प्रल्हाद शिंदे ह्यांच्या त्या काळातिल अलिबाग मधला त्यांच्या गाण्याच्या कारेक्रमाच्या कैक आठवणी सांगितल्या.मला तर जसा खजिनाच सापडला .


हातावर पोटअसणारा ,समुद्राला भिडणारा ,शहाळ्या सारखं मोठं प्रेमळ मन असणारा हा धाडसी कोळी समाज किती गोड,किती ऊर्जेने भरलेला आहे हि प्रचिती ह्या मासे विकणाऱ्या नाचत गात कोळी गीत गाणाऱ्या आजीला पाहून आली.


आणि मनात विचार आला "आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय "


आजीला भेटून त्यांचे कोळीगीत ऐकून माझी तर ऊर्जा द्विगुणित झाली ,मी शूटिंग संपवली आणि मग सुखा  म्हावरा ,कोळंबी ,सुखट, पापलेट ,सोलकडी वर ताव मारत..काय ते मासे ..काय तो समुद्र ..काय तो कोळी समाज ..सगळं ok मधी हाय ..म्हणत अलिबागचा निरोप घेतला .''


उत्कर्षच्या या व्हिडिओची खूप चर्चा होतेय. आणि खूप मनापासून हा व्हिडीओ सर्वानी पहिला आहे.