Trending Viral Video : लहान मुलं देवा घरची फुलं असतात. गोंडस, अगदी गोड अशी ही मुलं आपल्याला अख्ख जग विसरायला लावतात. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचे ते इवलेश इवलेशे गोड आवाजातील प्रश्न...त्यांचे घरभर बाळगणं...अगदी एक वेगळीच एनर्जी असते बुवा त्यांच्यामध्ये...कामावरून कितीही वाजता थकून आलो तरी त्याचा चेहऱ्या...त्याचे स्मित हास्य बघू सगळ्याचा थकवा एका सेकंदात नाहीसा होतो. सोशल मीडियावर (Social media) आज आपल्याला अनेक गोंडस, क्यूट, नटखट मुलांचे व्हिडीओ (Children's videos) पाहिला मिळतात. पण सध्या एका सोनपरीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 


वारंवार पाहावा असा व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चिमुकलीचा व्हिडीओ वारंवार पाहावा असा आहे. तिचे ते मधुर सुरात गाणं आपल्याला वेड लावल्याशिवाय राहत नाही. ही गोंडस मुलगी अगदी निरागसपणे विचारते...मी अयि गिरि नन्दिनी नन्दिती म्हणून का...तिच्या या प्रश्नाला कोणी मुर्खच असेल जो नाही म्हणेल...तिचा वडिलांनी हो म्हटलं आणि हे काय...मोठ्यांना पण लाजवेल अशा सुरात आणि शुद्ध उच्चार करत तिने कालिदासांनी रचलेली ही स्तुती इतक्या सहज म्हटली की ऐकाणाऱ्यांना क्षणभर सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. (viral video little girl singing Aigiri Nandini Nandini Kalidasa pune trending on Social media)


मंत्रुमग्ध करणारा आवाज! 



हा व्हिडीओ नेटकरीला पुन्हा पुन्हा पाहत आहेत. गोरीपान, छोटीशी ही बाहुली जेव्हा अयि गिरि नन्दिनी नन्दिती म्हणते सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. लोकप्रिय कालिका स्तुती आपण अनेक वेळा नवरात्रीच्या वेळी आणि नृत्यकला आविष्काराचा वेळी ऐकली असेल. पण या बालवयात इतक्या सहज त्या चिमुरडीने गायली की क्षणभर आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. 



हा व्हिडीओ तिच्या वडिलांनी इन्स्टाग्रामवर saurabhdaftardarandaditee07 या अकाऊंटवर शेअर केला आहे. या अकाऊंटवर तिचे लहानपणीपासूनचे अनेक व्हिडीओ आहेत. ज्यात ही गोंडस सोनपरी तिच्या छोट्या छोट्या गोष्टीतून...तिच्या बडबडीतून आपलं मनं जिंकते...अहो अगदी वेड लावते असं म्हटलं तरी चालेल. या अकाऊंटवर या चिमुकलीचे इकते भारी भारी व्हिडीओ पाहून तुमचं मनं प्रसन्न होऊन जातं. ती क्यूट गोड स्माईल, ते टपोरे डोळे, आणि त्या इवल्याशा इवल्याशा गोंडस सोनपरीचे गोड गोड प्रश्न...तिची ती बडबड अगदी सारखी ऐकवंत राहवंस वाटतं. या चिमुकलीने अख्खा सोशल मीडियाला वेड लावलं आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. 




ही चिमुकली महाराष्ट्रातील (Maharashtra news) पुण्यातील (Pune video) आहे. तुम्हाला ती मेट्रोमध्ये प्रवास करणारी रडणारी मुलगी आठवते...अहो ती हिच मुलगी आहे. जिला मेट्रोमध्ये प्रवास करायची उत्सुकता होती. पण मेट्रोमध्ये चढल्यानंतर गर्दी पाहून ती मुलगी घाबरली आणि रडायला लागली. परत मेट्रोमध्ये नाही जायचं असं तिचा सुर होता. 




या गोंडस मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हाही या सोनपरीचा व्हिडीओ नेटकरी कितीतरी दिवस पुन्हा पुन्हा पाहत होते. एकदी एकमेकांना पाठवत होते.  तिचे व्हिडीओ पाहून अनेकांना आपली लहान मुलगी आठवत आहे. तर कोणाला आपली नातं...ही गोंडस मुलगी तुमच्या नात्यातील तर नाही ना? काही असो सध्या सोशल मीडियामुळे ही गोंडस मुलगी आज प्रत्येक घरात पोहोचली आहे.