बाईक वेगाने पळवत असतानाच दुपट्टा पुढच्या चाकात अडकला, पुढे काय झालं पाहा; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीचा बाईक चालवतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत ती बाईक चालवत असताना अचानक तिचा दुपट्टा पुढच्या चाकात अडकतो. यानंतर पुढे काय होतं ते पाहा....
अनेक तरुणी, महिला बाईकवरुन प्रवास करताना आपला दुपट्टा, ओढणी वरती घेत नाहीत. यामुळे त्या चाकात अडकून दुर्घटना होण्याची भिती असते. अशा घटनांमध्ये अनेकदा आपला जीवही गमवावा लागतो. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुनिता मनोहर मोरे नावाची ही तरुणी गळ्यात स्कार्फ घालून बाईक चालवत असतानाच अचानक हा स्कार्फ पुढील चाकात अडकतो. या घटनेनंतर तिच्या मागे बसलेल्या मैत्रिणीलाही नेमकं काय झालं ते कळत नाही. पण सुदैवाने आजुबाजूच्या लोकांनी धाव घेतल्याने तिचा जीव वाचला. सुनिता मोरेने स्वत: इंस्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर केला असून रस्त्यावरुन दुचाकी चालवताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
व्हिडीओत सुनिता मोरेने बाईक चालवताना हेल्मेटसह गळ्यात स्कार्फ गुंडाळल्याचं दिसत आहे. यादरम्यान जोरात हवा सुरु असल्याने तिचा स्कार्फ थेट पुढील चाकात जाऊन अडकतो. स्कार्फ चाकात अडकल्याने सुनिता पुढे ढकलली जाते. व्हिडीओत ती बाईक जसजशी पुढे जाते तशी खाली वाकताना दिसत आहे. यानंतर ती ब्रेक दाबते. तिच्या मागे बसलेली मैत्रीण काय झालं हे आश्चर्याने पाहत असते. यावेळी एक व्यक्ती धावत येतो आणि तिची सुटका करण्यासाटा प्रयत्न करतो. यावेळी ती हाताने इशारा करत दुपट्टा गळ्यात अडकल्याचं सांगते. या दुर्घटनेत सुनिताच्या मानेला दुखापत झाली आहे.
सुनिता मोरेने इंस्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर केला असून, दुचाकी चालवताना असे कपडे अंगावर घालणं टाळा असा सल्ला दिला आहे. तसंच मदतीला धावणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मी शांतपणे दुचाकी चालवत असताना अचानक माझा दुपट्टा चेनमध्ये अडकला आणि मानेला हलकी दुखापत झाली. मला मद करणाऱ्यांची मी फार आभारी आहे. दुचाकीवर असताना तुन्ही चालवत असा किंवा मागे बसलेले असा; दुपट्टा घालणं टाळा. सुरक्षित राहा, मी यावेळी लकी होते".
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी प्रसंगावधान दाखवल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "आपण सर्वांनी तिने दाखवलेल्या प्रसंगावधनतेचं कौतुक केलं पाहिजे. ज्याप्रकारे तिन ब्रेक दाबला आणि न घाबरता परिस्थितीचा सामना केला". तर एकाने लिहिलं आहे की, "अशा स्थितीतही तू बाईक योग्य प्रकारे नियंत्रित केलीस यासाठी तुझं कौतुक आहे. आम्हीही दुचाकी चालवताना अनेकदा दुपट्टा घातलेल्या महिलांना वॉर्निंग देत असतो. तू दुपट्टा घालताना हा विचार केला नाहीस का?".
चौथ्याने लिहिले. ''नियम आहे की, कोणत्याही मशीनसमोर सैल कपडे परिधान करु नये. कॉमन सेन्स असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे कळेल. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण त्याचे पालन केले पाहिजे आणि इतरांनाही शिक्षित केले पाहिजे. चमत्काराने, फक्त किरकोळ दुखापत झाली. त्यातून शिका आणि नियमांचं पालन करा".