Viral Video: रात्री 2 वाजता घरात बिबट्याची एन्ट्री अन्...; धक्कादायक CCTV व्हिडिओ व्हायरल!
leopard CCTV Video, Ahmednagar: अनेकदा जंगलातील धोकादायक प्राणी मानवी वस्तीत येऊन हल्ला करतात. त्यात प्रामुख्याने शिकार बनतात ते पाळीव प्राणी. तर कधी कधी माणसांवर देखील बिबट्या झडप घालताना दिसतात.
Leopard CCTV Viral Video: अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावात वनविभागाच्या कार्यालय परिसरात आणून ठेवलेल्या बिबट्याकडे वनविभगाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला होता. कोपरगांव येथून पकडलेल्या बिबट्याची उपासमार सुरू असून बिबट्याला चक्क चपात्या खावू घातल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अशातच आता राहुरी तालुक्यातील एक सीसीटीव्ही (CCTV Video) व्हिडिओ समोर आला आहे.
अहमदनगरमधील (Rahuri taluka, Ahmednagar) राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात घुसलेल्या बिबट्याला एका कुत्र्याने घाबरलं. मात्र, कुत्र्याने त्यावेळी आवाज करत बिबट्याला (leopard entered the rural area) पाळवून लावलं. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. बिबट्याचा वावर असल्याने आसपासच्या परिसरात दहशतीचं वातावरण असल्याचं समोर येतंय.
पाहा Video
बदल्या औद्योगिक क्रांतीमुळे जंगली प्राणी आता मानवी वस्तीकडे वाटचाल करताना पहायला मिळतात. अनेकदा जंगलातील धोकादायक प्राणी मानवी वस्तीत येऊन हल्ला करतात. त्यात प्रामुख्याने शिकार बनतात ते पाळीव प्राणी. तर कधी कधी माणसांवर देखील बिबट्या झडप घालताना दिसतात. राहुरी देखील बिबट्याच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ(Leopard Viral Video) समोर आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, वास्तविक जंगली श्वापद, हिंस्त्र प्राणी यांच्यापासून माणसांना काही धोका होऊ नये, माणसांपासून या प्राण्यांना काही इजा होऊ नये याची जबाबदारी वनविभागाकडे असते. त्यामुळे वनविभागाने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Footage) बसवले आहेत. याच सीसीटीव्ही व्हिडिओच्या माध्यमातून बिबट्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.